शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा

By admin | Published: July 12, 2017 9:05 AM

25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे बसमधील अमरनाथ अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला दहशतवादी रोखता येणं शक्य होतं. जर का बस निर्धारित वेळेत हायवेवरुन गेली असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता. दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती आणि इशा-याकडे गंभीरतेने पाहिलं असतं तरी हा हल्ला टाळता आला असता. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. 
 
आणखी बातम्या
 
अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, "अनंतनागच्या एसएसपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांकडून 100 ते 150 यात्रेकरु आणि जवळपास 100 पोलिसांची हत्या करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय यात्रेकरुंवर हल्ला करत धार्मिक तणाव वाढवण्याचाही कट आखला जाऊ शकतो. मिळालेल्या अलर्टनुसार ज्याप्रकारचे इनपूट मिळाले आहेत ते पाहता समन्वयाची गरज आहे. एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. सुरक्षेसाठी तैनात सर्व अधिकारी आणि जवानांना अत्यंत अलर्ट राहण्याची आणि सावधानता बाळगण्याची गरज असल्याचा आदेश दिला गेला पाहिजे. दहशतवाद्यांनी हिंसा करण्यासाठी आखलेला कट मोडून काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजेत".
 
जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या अधिका-यांना या अलर्टची माहिती देत सावध केलं होतं. अमरनाथ यात्रेसाठी याच राज्यांमधून सर्वात जास्त लोक सहभागी होत असतात. 
 
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
 
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. 
 
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
 
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
 
मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे. उषा सोनकर आणि उर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. जखमींमध्येही महाराष्ट्रातील आठ जणांचा सामवेश आहे.