- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस यावर्षी २९ जूनपासून प्रारंभ होत असून, यात्रेची नोंदणीही सुरू झाली आहे, अशी माहिती श्री अमरनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाने (एसएएसबी) दिली. यात्रा २९ जूनला सुरू होऊन ७ आॅगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी एसएएसबीने देशभर व्यवस्था केली आहे. तीन बँकांच्या 433 शाखांत भाविक नोंदणी करू शकतात. पवित्र अमरनाथ गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. बालटाल आणि चंदनवाडी या दोन्ही मार्गाने मंदिराकडे जाण्यासाठी बँका तसेच टपाल कार्यालयांद्वारे नोंदणी होते.7500यात्रेकरूंना गेल्यावर्षी प्रमाणेच दररोज पहलगाम आणि बालटाल मार्गे पवित्र अमरनाथ गुहेकडे रवाना केले जाईल.गेल्यावर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान काश्मीर खोऱ्यात हिंसाचार झाला होता. तथापि, त्याचा अमरनाथ यात्रेकरूंच्या उत्साहावर यावर्षी कोणताही परिणाम झालेला नाही.यंदा झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे बाबा बर्फानी (हिम शिवलिंग) आपल्या पूर्ण आकारात दर्शन देतील, असा भक्तांचा विश्वास आहे. यात्रेकरूंसाठी देण्यात आलेल्या सूचना... तंदुरुस्ती (मेडिकल फिटनेस) प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही भाविकाला यात्रा करता येणार नाही. १३ वर्षांहून कमी आणि ७५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना यात्रेसाठी मुभा दिली जाणार नाही.यात्रेसाठी 50 रुपये एवढे नोंदणी शुल्क आहे. श्री अमरनाथ विश्वस्त मंडळ यात्रेकरूंचा नि:शुल्क विमा काढणार असून त्यासाठी यात्रेकरूंना ‘अ’ अर्ज भरून द्यावा लागेल. नोंदणीची व्यवस्थायात्रेसाठी देशभर पंजाब नॅशनल बँकेच्या ३०७, जम्मू-काश्मीर बँकेच्या ८७ आणि यस बँकेच्या ४० शाखांत नोंदणी होईल. सर्व बँकांनी नोंदणी प्रक्रियेची तयारी केली असून अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू
By admin | Published: June 17, 2017 12:34 AM