नवी दिल्ली : समाजवादी पार्टीतील बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा करणाऱ्या अखिलेश यांच्यावर मुलायम सिंह यांच्या गटाच्या अमरसिंह यांनी आज हल्लाबोल केला. अखिलेश यांनी बनावट स्वाक्षऱ्यांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली, असा दावाही अमरसिंह यांनी केला. याबाबत बोलताना अमरसिंह म्हणाले की, संख्याबळाचा विचार फक्त सरकार स्थापन करताना लागू होतो. पक्षाच्या निवडणूक चिन्हासाठी नाही. दरम्यान, मुलायमसिंह आणि अमरसिंह हे सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तर, अखिलेश यांच्या वतीने रामगोपाल यादव हेही सोमवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. याबाबत बोलताना रामगोपाल यादव यांनी सांगितले की, आम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्रे आयोगाकडे सादर केली आहे. अमरसिंह यांना झेड दर्जाची सुरक्षा राज्यसभा सदस्य अमर सिंह यांना केंद्र सरकारने आता झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री याबाबतचा एक आदेश जारी केला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) तत्काळ ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. च्सीआयएसएफचे दोन डझन सशस्त्र कमांडो त्यांच्या सुरक्षेत असतील. तर, दिल्लीत स्थानिक पोलिसांची टीम सुरक्षेला असेल. ...तर सायकल गोठविणार? निवडणूक आयोगाने जर १७ जानेवारी पर्यंत सायकल चिन्हाबाबत निर्णय घेतला नाही तर, सायकल चिन्हच गोठविले जाऊ शकते. उत्तरप्रदेशात १७ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. ज्या गटाकडे खासदार, आमदार, प्रतिनिधी यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक संख्याबळ आहे त्यांनाच पक्षाच्चा नियंत्रणासाठी प्राधान्य देण्यात येईल.आताही मीच सपाचा अध्यक्ष : मुलायमसिंह समाजवादी पार्टीचा आजही मीच अध्यक्ष आहे, असे मुलायम सिंह यादव यांनी म्हटले आहे. ज्या राष्ट्रीय अधिवेशनात मुलायमसिंह यांना अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले त्या अधिवेशनाच्या वैधतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ३० डिसेंबर रोजी आपण रामगोपाल यादव यांना पक्षातून काढून टाकले. मग, ते अधिवेशन कसे बोलावू शकतात? असा सवाल त्यांनी केला.
‘यादवी’त अमरसिंह यांनी घेतली उडी?
By admin | Published: January 09, 2017 1:45 AM