मुंबई : आॅनलाइन खरेदी-विक्री वाढलेली असताना विक्रेत्यांकडूनही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-वाणिज्य वेबसाइटला सर्वाधिक पसंती मिळत आहे. नेल्सनने जानेवारी ते मार्च या तिमाहीत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. कंपनीने ११८४ आॅनलाइन विक्रेत्यांना या सर्वेक्षणात सहभागी केले होते. या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ३९ टक्के आॅनलाइन विक्रेते हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक ई- वाणिज्य वेबसाइट तपासून पाहतात. या माध्यमातून आपले उत्पादन विकता यावे आणि व्यवसाय वाढविता यावा, हा त्यामागचा उद्देश असतो. ई-वाणिज्य वेबसाइटच्या बाबतीत चांगली माहिती असणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण त्या माध्यमातून बँ्रडबाबत सकारात्मकता वाढते. या सर्वेक्षणानुसार अॅमेझॉनला पसंती देणाऱ्यांची संख्या सर्वात अधिक म्हणजे २५ टक्के आहे, तर फ्लिपकार्टला २१ टक्के आणि स्नॅपडीलला २० टक्के लोक पसंती दर्शवितात. निल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक डॉली झा यांनी सांगितले की, ई-वाणिज्य उद्योग झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. आॅनलाइन विक्रेत्यांचाही एक समूह तयार होत आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन साधण्यासाठी देशातील ई-वाणिज्य वेबसाइटने किंबहुना, त्या व्यावसायिकांनी आॅनलाइन विक्रेत्यांसाठी एक आकर्षक व्यासपीठ तयार करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकूणच काय, तर ग्राहकांना दुकानांपर्यंत आकर्षित करण्याचा काळ आता मागे पडत असून, विके्रतेच थेट ग्राहकांच्या उंबरठ्यावर सेवा देत असल्याने, हा व्यवसाय आगामी काळात आणखी झेप घेईल, असे चित्र आहे. (वृत्तसंस्था)आॅनलाइन खरेदीचा ग्राहक ग्रामीण भागातहीयापूर्वीच्या काही अहवालांवरून हे दिसून आले आहे की, आॅनलाइन खरेदीचा ग्राहक शहरी आणि ग्रामीण भागातही वाढत आहे. विविध विक्रेत्यांकडून मिळणारी चांगली उत्पादने, तसेच सेवा यामुळे ग्राहकांना आॅनलाइनची भुरळ पडल्याचे चित्र आहे. अर्थात, विक्रेते आणि ई-वाणिज्य वेबसाइट यांची सेवा व विश्वासार्हता या बाबीही यात महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलला विक्रेत्यांची पसंती
By admin | Published: June 14, 2016 4:20 AM