ॲमेझॉनने ८,५४६ कोटी रुपयांची लाच दिली, मोदी सरकारवर काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:31 AM2021-09-23T10:31:49+5:302021-09-23T10:32:49+5:30
ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले?
शीलेश शर्मा -
नवी दिल्ली : ॲमेझॉन कंपनीद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांकडून ८ हज़ार ५४६ कोटी रुपये दिले गेल्याच्या मुद्यावर मोदी सरकार वादात सापडताना दिसत आहे. कारण काँग्रेसने थेट आरोप केला की, ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली आहे. पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारले की, ॲमेझॉनच्या ६ कंपन्यांनी मिळून जे ८,५४६ कोटी रूपये दिले त्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत? हा पैसा काढून कोणाला आणि कोणत्या प्रकारे दिला गेला? सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर सुपारी घेतल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले?
जबाबदारी कोणाची?
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही सरकारला लक्ष्य करून ट्वीटरवर म्हटले की, “देश पोखरला जात आहे आणि केंद्र सरकार झोप घेत आहे.” गांधी यांनी मादक द्रव्यांच्या तस्करीवर म्हटले की, या विषामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेकडो कुटुंबांची जबाबदारी केंद्र सरकारची नाही?