मुकेश अंबानी यांच्यासाठी कोरोना काळातील मंदी भली मोठी संधी घेऊन आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला फेसबुक, गुगल सारखे मोठमोठे गुंतवणूकदार मिळाले आहे. आता तर अंबानींना यापेक्षाही तगडा भिडू मिळणार आहे. दुसरा तिसरा कोणी नसून ईकॉमर्स क्षेत्रात जगावर राज्य करत असलेली अॅमेझॉन (Amazon) कंपनी आहे.
रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायामध्ये Amazon 20 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात ही किंमत 1.5 लाख कोटी रुपये एवढी होते. याचाच अर्थ रिलायन्स रिटेल व्य़वसायातील 40 टक्के वाटा अॅमेझॉनला विकणार आहे. याबाबतची माहिती या व्यवहाराशी संबंधित सूत्राने दिली आहे.
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) सोबत सुरु असलेली ही डील यशस्वी झाली तर भारतालाच रिटेलमधील महारथी मिळणार नाही तर जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेजोस आणि आशियातील सर्वात श्रीमंत अंबानी यांच्यामधील व्यावसायिक संबंधांमुळे जागतिक बाजाराचा रस्ता खुला होणार आहे. ही अॅमेझॉनसाठी भारतातील सर्वात मोठी डील असणार आहे.
वाहता झरारिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर सलग चौथ्या दिवशी वाढले असून आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्समध्ये 7500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यामुळे रिलायन्सचे बाजारमुल्य वाढून 14.07 लाख कोटींवर गेले आहे. याआधी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिटेलमध्ये पैसा लावला आहे. ही जगातील सर्वात मोठी टेक इन्व्हेस्टर कंपनी आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीला रिलायन्समध्ये 1.75 टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. अमेरिकी इक्विटी फर्म केकेआर आणि फेसबुकने रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. फ्यूचर ग्रुपसोबत रिलायन्सचा सौदा पक्का झाला की या कंपन्या रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार आहेत.
फ्युचर ग्रुप ताब्यातरिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे. हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे.
रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स 1200 कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच 6.09 टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिव्या 400 कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण 7.05 टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे.
Netmeds ची खरेदीरिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये (Netmeds) 60 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील 620 कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली. RRVL ने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के मालकी खरेदी केली आहे.
जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन