दसॉल्टच्या पैशांतून अंबानींनी जमीन खरेदी केली : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:24 PM2018-11-02T12:24:36+5:302018-11-02T12:26:12+5:30
दसॉल्ट कंपनीने 284 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एका व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम वळती करण्यात आली.
नवी दिल्ली : अनिल अंबानींना कंत्राट दिल्याचे कारण केवळ त्यांच्याकडे जमीन होती, असे दसॉल्टचा सीईओंनी सांगितले, हे सपशेल खोटे आहे. खरेतर अंबानींकडे जी कथित जागा आहे ती दसॉल्टनेच दिलेल्या पैशांनी घेतल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
दसॉल्ट कंपनीने 284 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अनिल अंबानींच्या खात्यात ही रक्कम वळती करण्यात आली. दसॉल्टचा सीईओ कशाला खोटे बोलून अंबानींना वाचवत आहे. नुकसानीत असलेल्या कंपनीमध्ये का पैसे गुंतवले. यामागे एकच व्यक्ती आहे. मोदी यांनी अंबानीना फायदा करून दिला, असा आरोप करत याचे पुरावेही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवले.
Rafale is an open and shut case. It is simply a PM Modi-Anil Ambani partnership: Congress President Rahul Gandhi #RafaleDealpic.twitter.com/IFrWPnkJEx
— ANI (@ANI) November 2, 2018
Dassault invested Rs 284 Crore in the company of Anil Ambani. Anil Ambani bought land with the same money. This is clear that Dassault CEO is lying. Why did they invest Rs 284 crore in a loss-making company?: Congress President Rahul Gandhi #RafaleDealpic.twitter.com/InY7ggJHrC
— ANI (@ANI) November 2, 2018
या प्रकरणात सीबीआय प्रमुखांनी लक्ष घातल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. आता न्यायालयालाही राफेल विमानांची किंमत देण्यास सरकारने नकार दिला आहे. केवळ 8 लाखांच्या कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मोदींनी राफेलची डील अंबानींना दिल्याने त्यांना थेट 30 हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.