ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भाजपाचे नेते आणि हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसीने केलेल्या विवादित वक्तव्य नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. दलित मतांवर डोळा ठेवत ओवेसीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा गांधींपेक्षा मोठे नेते असल्याचे म्हटले आहे. आंबेडकरांनी आपल्याला धर्मनिरपेक्ष आणि वर्ग मुक्त राज्यघटना दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपा आणि आरएसएसवर ही निशाना साधला आहे.
उत्तरप्रदेश मध्ये निवडणुक प्रचारासाठी आयोजित पक्षाच्या रोड शो दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे.
यादरम्यान नोटबंदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील ओवेसीने टीका केली. भाजप आणि समाजवादी पार्टीवर त्यांनी टीका केली. पण बसपा आणि काँग्रेसवर काहीही बोलले नाही. ओवेसीने म्हटले आहे की, भ्रष्टाचार आणि गरीबी नोटबंदीमुळे नाही संपणार. उलट यामुळे गरीबांना संपवण्याची तयारी होत आहे. आता तर जवानांच्या जेवनातही भ्रष्टाचार होत आहे. जवानांना पोटभर जेवनही दिले जात नसल्याचे असदुद्दीन ओवेसींनी म्हटले आहे.