रांची : खूप रक्तस्राव होत असलेल्या व बेशुद्धावस्थेतील गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास रुग्णवाहिका नाकारण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मोटारसायकलवर बसवून आरोग्य केंद्रात नेले. तिथून मात्र तिला अॅम्ब्युलन्सने एका रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली व लगेचच दुसऱ्या रुग्णालयात हलविले. झारखंडमधील या महिला रुग्णाचे अशा पद्धतीने हाल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.शांतीदेवी (३० वर्षे) या गर्भवती महिलेची प्रकृती खूपच बिघडल्याने तिला चांडवा आरोग्य केंद्रात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळू शकली नाही. त्यामुळे तिच्या घरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या चांडवा आरोग्य केंद्रामध्ये तिला मोटरसायकलवरून नेण्यातआले.तेथील डॉक्टरांनी या महिलेला लातेहार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आरोग्य केंद्रापासून हे रुग्णालय २७ किमी इतक्या अंतरावर आहे.तेथे तिला नेण्यासाठी सुदैवाने अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली. तिथे तपासणी झाल्यावर पुन्हा शांतीदेवीला रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांनीसांगितले.गंभीर अवस्थेतील या महिला रुग्णाची त्रिस्थळी यात्रा अखेर या रुग्णालयात पोहोचून तिला तिथे दाखल करून घेण्यात आले.प्रकृती बिघडलेल्या शांतीदेवीला उत्तम उपचारांच्या नावाखाली आरोग्य केंद्र व रुग्णालयांतील डॉक्टरांनी जी धावपळ करायला लावली ती धक्कादायक होती. रुग्णांना मदत करण्याचे काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेत डॉक्टरांनाच साथ दिली.शांतीदेवीचा पती कमल गंजू यांनी सांगितले की, आम्ही अॅम्ब्युलन्स मागविली होती. १०८ क्रमांकावर दूरध्वनीही केला होता. मात्र, तिथून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शांतीदेवीला मोटारसायकलवरून आरोग्य केंद्रात आणण्याशिवाय आमच्यासमोर पर्यायही नव्हता. (वृत्तसंस्था)जिवाशी केला खेळमाकपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते अयूब खान यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारणे, तिला रक्त देण्यास लातेहार सदर रुग्णालयाने नकार देणे ही गंभीर बाब आहे.तेथील डॉक्टरांनी शांतीदेवीच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला.
अॅम्ब्युलन्स नाकारली; गर्भवतीला नेले दुचाकीवरून, झारखंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 4:45 AM