सिंगापूर : देशाची आर्थिक स्थिरता व अनुमानक्षमता वाढविण्यासाठी भारताचे करविषयक कायदे हळूहळू बदलले जात असून, यामध्ये ‘जीएसटी’ हे त्या दिशेने टाकलेले प्रमुख पाऊल असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सांगितले. येथे गुरुवारी सुरू झालेल्या कायदेविषयक जागतिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात जेटली व्हीडीओ प्रसारणात बोलत होते. गुंतवणूकदारांचा कल नेहमी स्थिर देशांकडे असतो, असे नमूद करून ते म्हणाले की, अस्थिरता कोणालाही नको असते. भारतात आर्थिक स्थिरता यावी यासाठी आम्ही आमचे कायदे बदलत असून, देशातील राज्यानांही यासाठी तयार केले जाईल. या परिषदेला ४० देशांमधील ५०० प्रतिनिधी उपस्थित असून, त्यांच्या समोर जेटली यांचा व्हीडीओ संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले की, भारतातील आंतरराज्य व्यापारातील अडथळे व तफावत दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक विषयांत आदर्श कायदे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
करविषय कायद्यात भारत करतोय सुधारणा - जेटली
By admin | Published: January 22, 2016 3:05 AM