हाँगकॉग - हाँगकाँग संसदेने निवडणूक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गुरुवारी मंजूर केले असून, या दुरुस्तीमुळे जनतेचा मतदानातील सहभाग कमी झाला असून, बीजिंग समर्थक खासदारांची संख्या वाढविण्यात आली आहे. या नवीन कायद्याने शहराच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाला सक्षम उमेदवारांच्या पार्श्वभूमीबाबत चौकशी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच देशभक्त उमेदवार एक नवीन समिती ठरविणार आहे. हाँगकाँग संसदेतील सदस्य संख्या ९० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यापैकी ४० सदस्य बीजिंग समर्थक समितीकडून निवडले जातील, तर हाँगकाँगच्या जनतेतून थेट २० सदस्य निवडले जातील. विधेयक संमतगुरुवारी हे विधेयक बहुमताने (४० विरुद्ध २ मते) संमत करण्यात आले. या दुरुस्ती कायद्यानुसार निवडणूक समितीकडून उमेदवार नामनियुक्त केले जातील. या समितीकडून आतापर्यंत हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीच निवड केली जायची.
हाँगकाँग निवडणूक कायद्यात दुरुस्ती; जनतेचा सहभाग कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:26 AM