शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

अमेरिकेने केले भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक; धार्मिक स्वातंत्र्य अहवालात उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 9:31 AM

२०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

वॉशिंग्टन : भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू- मुस्लीम सौहार्द वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.

 २०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

   दरम्यान,  रशिया, भारत, चीन आणि सौदी अरेबियासह अनेक देशांतील सरकारे उघडपणे धार्मिक समुदायांच्या सदस्यांना लक्ष्य करत आहेत, असेही  मत अहवालात व्यक्त केले गेले आहे.

परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अहवाल जारी केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाचे विशेष दूत रशद हुसैन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक देश उघडपणे आपल्या हद्दीत धार्मिक समुदायांच्या सदस्यांना लक्ष्य करीत आहेत.

कायद्याचे वकील आणि भारतातील विविध धार्मिक समुदायांशी संबंधित धार्मिक नेत्यांनी हरिद्वार शहरातील मुस्लिमांविरुद्ध उघड द्वेषयुक्त भाषणाच्या प्रकरणांचा निषेध केला आहे आणि देशाला सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले.

काय आहे अहवालात?अनेक राज्यांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या सदस्यांविरुद्ध अधिकाऱ्यांनी हिंसाचार केल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, ज्यात गुजरातमध्ये एका उत्सवादरम्यान पोलिसांनी हिंदू उपासकांना जखमी केले. यावेळी मारहाणही करण्यात आली. मध्य प्रदेश सरकारने रगोनमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाची घरे आणि दुकानांवर बुलडोझर चालवल्याचा उल्लेखही अहवालात आहे. 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाAmericaअमेरिका