गुवाहाटी : अमेरिकेच्या काउंसिल जनरल मेलिंडा पावेक यांनी दुसऱ्या महायुद्धातआसाममध्ये मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी आसाम सरकारकडे मदतीचा हात मागीतला आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या काउंसील जनरल मेलिंडा पावेक यांनी गुरुवारी कोलकाता येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना हिमंता यांच्याकडे सैनिकांचे अवशेष शोधण्यात मदत करण्याची विनंती केली.
यासंदर्भात ट्विट करताना, हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘अमेरिकेच्या काउंसिल जनरल यांनी दुसऱ्या महायुद्धात आसाममध्ये जीव गमावलेल्या जवळपास 1,000 अमेरिकन सैनिकांचे अवशेष सोधण्यासाठी मदत मागितली आहे. यासंदर्भात, मी त्यांना शक्यती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.’
सरमा यांनी भारत आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यातील घनिष्ठ संबंधांचा उल्लेख केला. तसेच, अमेरिकन गुंतवणुकीसाठी आसामच्या वाढत्या आर्थिक क्षमतेवरही भर दिला. याशिवाय, मुख्यमंत्री कार्यालयाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘काउंसिल जनरल मेलिंडा पावेक आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटून अत्यंत आनंदीत होत्या. यावेळी त्यांनी क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, कृषी, आरोग्य आणि हवामान बदलासह अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.’