खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारतानेकॅनडाला तपासात सहकार्य करावे, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले आहे. "भारताने आपल्या तपासात कॅनडासोबत काम करून सहकार्यात्मक पद्धतीने आपसातील मतभेद दूर करावेत, असे आम्हाला वाटते," असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन म्हणाले, भारत आणि कॅनडा हे दोन आमचे सर्वात जवळचे मित्र आणि भागीदार आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे वाद अथवा मतभेत दूर करावेत, असे अम्हाला वाटते. एवढेच नाही, तर यासंदर्भात आपण भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन '2+2' बैठकीसाठी भारतात आले होते.
आम्ही सर्व भागीदार मित्रांसोबत बोलत आहोत - क्वात्राएका वेगळ्या मीडिया ब्रीफिंगदरम्यान परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, भारताने कॅनडातील खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांचे गांभीर्य अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. क्वात्रा म्हणाले, कॅनडासंदर्भात बोलायचे झाल्यास, आम्ही आमच्या सर्व मित्र आणि भागीदारांशी संवाद साधत आहोत. या विषयावरील आपली भूमिका आम्ही सविस्तर मांडली आणि स्पष्ट केली आहे.
भारतानं पन्नूच्या व्हिडिओकडं आकर्षित केलं लक्ष -क्वात्रा म्हणाले, आपल्या भागिदारांसोबत चर्चा सुरूच आहे. नुकताच पन्नूचा एक व्हिडिओ समोर आला होता. जो भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंतित करणारा होता. पन्नूने नुकताच एक व्हिडिओ जारी करत, 19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या फ्लाइटने यात्रा करू नका, असे केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी धमकी दिली होती.