शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

By admin | Published: May 15, 2017 11:02 AM

सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीनं स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो. रिपोर्टनुसार, अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पदावर विराजमान झाल्यानंतर संरक्षण सामर्थ्यावर अधिक भर देणार असल्याचे सूतोवाच केले होते. अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये जवळपास 54 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. इसिसचा खतरा लक्षात घेता ट्रम्प यांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल रँकिंगच्या यादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आले आहे. अमेरिकेकडे 5884 टँक्स, 19 एअरक्राफ्टयुक्त हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 13,762 एअरक्राफ्ट, 415चं नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या लष्करी जवानांची संख्या 1,400,000च्या घरात आहे. तर रशियाकडे  20,215 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 3794 एअरक्राफ्ट आणि 352 नौदल सामर्थ्य असून, रशियाच्या सैन्याची संख्या 766055 जवळपास आहे. चीनकडे 6457 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 2955 एअरक्राफ्ट 714 नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या पीपल लिबरेशन आर्मीतील जवानांची संख्या 2335000 आसपास आहे. या सर्व देशांच्या पंक्तीत भारतही विराजमान झाला आहे. भारताकडे 4426 टँक्स, 3 हेलिकॉप्टर केरिअर, 2102 एअरक्राफ्ट, 295 नौदलाचं सामर्थ्य आणि 1325000 जवानांची संख्या आहे.