शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

अमेरिकी माध्यमांनी मोदींवर फोडले पराभवाचे खापर

By admin | Published: November 09, 2015 11:01 PM

बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय झटका असल्याचे विश्लेषण अमेरिकेतील मीडियाने केले आहे.

वॉशिंग्टन : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय झटका असल्याचे विश्लेषण अमेरिकेतील मीडियाने केले आहे. तथापि, भाजपच्या एक वर्षाच्या काळाचे हे नकारात्मक मूल्यांकन आहे, असेही राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.मिशिगन विश्वविद्यालयातील प्रोफेसर पुनीत मनचंदा म्हणतात की, दिल्लीमधील आपचा विजय हा नेत्यांकडून मतदारांचा झालेला अपेक्षाभंग अधोरेखित करतो; परंतु बिहारमधील पराभव हा भाजपच्या एक वर्षाच्या काळातील नकारात्मक मूल्यांकन दर्शवितो. सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर चिंता व्यक्त केली जात आहे, असे वाटते. कारण, बिहारसारख्या राज्यात भाजपचा पराभव होणे हा पक्षासाठी मोठा सेटबॅक आहे. कोण काय म्हणाले? द वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, महत्त्वपूर्ण निवडणुकीत भारताच्या सत्तारूढ पार्टीने पराभव स्वीकारला. न्यूयॉर्क टाइम्समध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव हा भाजपसाठी मोठा राजकीय झटका आहे. या निकालाने पक्षाला त्या महत्त्वपूर्ण स्थानापासून बाजूला केले आहे, जेथून हा पक्ष पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात राजकीय वर्चस्व निर्माण करू इच्छित आहे. - वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये म्हटले आहे की, भाजपला हा मोठा दणका आहे जो की, मोदींच्या आर्थिक विकासाच्या योजनांना ब्रेक लावू शकतो. - नॅशनल पब्लिक रेडिओने म्हटले आहे की, हा पराभव मोदींना त्यांचा मार्ग बदलण्यासाठी प्रेरित करेल काय? कॅबिनेटमध्ये बदलांसह इतर बदल केले जातील का? हा मोठा प्रश्न आहे.- इंडियन नॅशनल ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज अब्राहम म्हणतात की, बिहारमधील नागरिकांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, ते वाढती असहिष्णुता आणि भाजपकडून होणारे ध्रुवीकरण याला ठाम विरोध करतात. ......