शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

भाजपाच्या त्या पोस्टरवर अमेरिकेचे सैनिक

By admin | Published: October 24, 2016 10:20 PM

स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ते पोस्टर आता चांगलेच वादात सापडले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24 - उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाने जोरदार तयारी सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे.  मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ते पोस्टर आता चांगलेच वादात सापडले आहेत. 
 
 
या पोस्टरवर भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैन्याचे फोटो लावण्यात आले आहेत. वाराणसी महानगरच्या वतीने लावण्यात आलेल्या या पोस्टरच्या खाली हातात बंदुका घेऊन असलेल्या सैनिकांचा फोटो लावण्यात आला आहे. पण दुदैव म्हणजे हा अमेरिकेतल्या १०१ एअरबॉर्न डिव्हिजनह्णच्या सैनिकांचा फोटो आहे. बँड ऑफ ब्रदर्स या प्रसिद्ध अशा मालिकेच्या पोस्टवर देखील हा फोटो लावण्यात आला होता.
 
 
उरी येथेली हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकव्याप्त काश्मीमरमध्ये शिरुन सर्जीकल स्ट्राईक्स करत पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त केली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी भारतीय सैन्य हाच भाजपाच्या प्रचाराचा हुकमी एक्का राहिल असेही मत अनेकांनी मांडले, त्यामुळे भाजपाच्या प्रचारात भारतीय सैनिकांची छायाचित्र अग्रस्थानी असतील यात काही शंकाच नाही. पण ज्याने देशासाठी प्राण लावले त्यांचे फोटो पोस्टरवर लावण्याऐवजी अमेरिकन सैनिकांचे छायाचित्र का लावले अशा टीका सोशल मीडियावर होत आहेत. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे.