...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाहंची चित्रपटावर प्रतिक्रिया, काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:53 AM2022-03-27T01:53:16+5:302022-03-27T01:54:34+5:30

शाह म्हणाले, 'ज्यांनी बघितला नाही, त्यांनी हा चित्रपट निश्चितपणे बघायला हवा, जेणेकरून त्यांना कळेल की, काँग्रेसच्या काळात काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होती.

Amidst the controversy BJP leader Amit shah told why should watch the kashmir files | ...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाहंची चित्रपटावर प्रतिक्रिया, काँग्रेसवर निशाणा

...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाहंची चित्रपटावर प्रतिक्रिया, काँग्रेसवर निशाणा

Next

अहमदाबाद - काँग्रेसच्या काळात काश्मीर घाटी कशा पद्धतीने छळ आणि दहशतीच्या गर्तेत होती? हे समजून घेण्यासाठी लोकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ बघायला हवा, असे वक्तव्य केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. ते शनिवारी अहमदाबाद महापालिकेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

'मोदींनी कलम 370 हटवलं' -
शाह म्हणाले, 'ज्यांनी बघितला नाही, त्यांनी हा चित्रपट निश्चितपणे बघायला हवा, जेणेकरून त्यांना कळेल की, काँग्रेसच्या काळात काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होती. पण जेव्हा आपण नरेंद्रभाई यांना (नरेंद्र मोदी) दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले, त्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले.

90 च्या दशकात जबरदस्तीने स्थलांतर
शहा म्हणाले, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट, 1990च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्यानंतर, काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ राज्यातून कशा प्रकारे जबरदस्तीने पलायन करावे लागले, यावर आधारित आहे.

सध्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट जबरदस्त चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत आहे, तर दुसरीकडे, विरोधी पक्ष, या चित्रपटाच्या माध्यमाने भाजप आपला अजेंडा पसरवत असल्याचा आरोपही करत आहे. अनेक भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे.

Web Title: Amidst the controversy BJP leader Amit shah told why should watch the kashmir files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.