समीक्षकांकडून प्रचंड दाद मिळवणारा मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अभिनेता राजकुमार रावच्या या सिनेमाला या वर्षी भारताकडून सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागातून नामांकन मिळालं होतं. ऑस्करच्या ट्विटर हॅंडलवरून फॉरेन लँग्वेज फिल्म अवार्ड लिस्टमध्ये पुढच्या फेरीत पोहोचलेल्या ९ चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी आपण किती पाहिलीतं? असे या tweetमध्ये लिहिले आहे. या यादीत न्यूटनचा उल्लेख नाहीये.
या सिनेमांना मिळाली एंन्ट्री --अ फनटॅस्टिक वूमन- इन द फेड- ऑन बॉडी अॅण्ड सोल- फॉक्सट्राट- द इनसल्ट- लव्हलेस- फेलिसीट- द स्क्वायर- द वूंड अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य करण्यात आलेय. नूतन कुमार (राजकुमार राव) हा दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी आपले नाव न्यूटन असे लिहितो आणि पुढे त्याच नावाने ओळखला जातो. त्यानंतर, त्याला नक्षलग्रस्त भागात निवडणूक अधिकारी म्हणून जावे लागते. लोकनाथ (रघुवीर यादव), मालको (अंजली पाटील), पोलीस अधिकारी आत्मा सिंह (पंकज त्रिपाठी) ही टीम घेऊन तो जंगलात जातो. तिथे गेल्यावर गावात फक्त ७५ मतदार असल्याचे त्याला कळते. पण मतदानाच्या दिवशी कुणीच येत नाही. पण नंतर सगळे चित्रचं पालटते आणि वेगळाच निकाल समोर येतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटातील राजकुमारच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.