शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

अमित शाह-अजित पवार तासभर गुफ्तगू, अनेक मुद्दे चर्चेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 10:16 AM

ही बैठक संपताच अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे २६, गुरुद्वारा रकाबगंज गाठले. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी दीर्घ चर्चा केली.

नवी दिल्ली : डेंग्यूमुळे दोन आठवडे विश्रांती घेत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येत सुधारताच शुक्रवारी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तासभर चर्चा केली. तत्पूर्वी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली.

शुक्रवारी सायंकाळी अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अमित शाह यांच्या ८, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्यासोबत तासभर गुफ्तगू केले. ही बैठक संपताच अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे २६, गुरुद्वारा रकाबगंज गाठले. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी दीर्घ चर्चा केली.

त्या फाइल्समध्ये दडलंय तरी काय?अमित शाह यांच्यासोबत अजित पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात बैठक सुरू असताना टेबलवरील अनेक फाइल्सही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. या फाइल्समध्ये नेमके काय दडले आहे याचीही त्या निमित्ताने चर्चा सुरू होती.

मराठा आरक्षण ते विधान परिषदेवरील नियुक्त्या... अनेक मुद्दे चर्चेला

मराठा आरक्षणाचा तिढाओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी अजित पवार यांच्या गटाची भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. 

लोकसभेचे मिशन-४५  ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ‘मिशन-४५’ विषयीच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा झाली.

आयोगापुढील सुनावणीनिवडणूक आयोगामध्ये खरी राष्ट्रवादी कोणाची यावर २० नोव्हेंबरपासून दैनंदिन युक्तिवाद होणार आहे. याविषयीही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

हेही मुद्दे चर्चेलासहकार क्षेत्रातील आव्हाने, मंत्रिमंडळाचा विस्तारात राष्ट्रवादीचा वाटा, विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या यावरही चर्चा झाल्याचे समजते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवार