Amit Shah On Rahul Gandhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (11 एप्रिल) आसाममधील दिब्रुगड येथे भाजप कार्यालयाच्या पायाभरणी समारंभात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, 'राहुलबाबा परदेशात जाऊन देशाबद्दल वाईठ बोलतात. हे असेच चालू राहिले तर संपूर्ण काँग्रेस देशातून नष्ट होईल.'
काँग्रेसवाले मोदींना शिव्या देतातअमित शाह पुढे म्हणाले, 'राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण काहीही झाले नाही. काँग्रेसचे लोक पंतप्रधानांची कबर खोदण्याचे वक्तव्य करतात. पण, देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. ते (विरोधक) पीएम मोदींबद्दल जितके वाईट बोलत राहतील, तितकी भाजप वाढेल. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहेत,' असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
राहुल गांधींवर निशाणा साधलाते पुढे म्हणतात, 'पीएम मोदी 14 तारखेला आसामला येत आहेत. ईशान्य हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही अलीकडच्या निवडणुकीत ते अपयशी ठरले. आसाममध्ये दुसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) आसामच्या 70 टक्के भागातून काढून टाकण्यात आला आहे, इतर राज्यांशी असलेले सीमा विवाद सोडवले जात आहेत.'
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारगृहमंत्री पुढे म्हणतात, 'भाजप हा संघटनेच्या जोरावर चालणारा पक्ष आहे आणि कार्यालय हे भाजपच्या सर्व कामांचे केंद्र आहे. सध्या ईशान्येतील 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या असून तिन्ही राज्यांमध्ये भाजप सरकारचा भाग आहे. ईशान्येतील 8 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे आणि त्यामुळे ईशान्येचा विकास झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममधील 14 पैकी 12 जागा जिंकेल आणि 300 हून अधिक जागांसह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील,' असंही ते यावेळी म्हणाले.