नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी लोकसभेत (Lok Sabha) जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर चर्चा केली. शाह बोलताना काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्यावर सातत्याने निशाणा साधत होते. (Amit Shah attacks on Adhir Ranjan Chowdhury with hen egg hen jibe in Lok Sabha)
यावेळी शाह म्हणाले, जर अधीर रंजन चौधरी यांनी पक्ष बदलला नसता, तर ते जिंकू शकले नसते. शाह यांच्या भाषणानंतर झालेल्या वाद-विवादानंतर 'मुर्गी-अंडा-मुर्गी'वरही लोकसभेत जोरदार हशा पिकला. अमित शाह भाषण देत असताना अधीर त्यांना सातत्याने टोकत होते. मग काय, अमित शाह यांनीही त्यांच्यावर 'इशाऱ्या-इशाऱ्यात' निशाना साधायला सुरुवात केली.
स्वत:कडे पाहून मग ठरवा तुम्ही हिशोब मागण्याच्या लायकीचे आहात की नाही; अमित शाह यांचा हल्लाबोल
शाह यांचे भाषण संपल्यानंतर अधीर रंजन यांनी सभापतींकडे बोलण्याची परवानगी मागितली. ते म्हणाले सकाळी आपल्या अर्थमंत्र्यांनी भाषण दिले आणि आता गृह मंत्री अमित शाह यांनी. असे वाटते, की दोघांनी दोन राज्यांच्या अर्थसंकल्पावर भाषण दिले आहे.
एक हिंदुस्तानच्या अर्थसंकल्पावर तर दुसरे जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावर. सकाळी सूर्य उगवतो, तेव्हा थोडा अंधार असतो. सूर्य उगवण्यापूर्वी कोंबडे बांग द्यायला लागतात. त्यांना वाटते, की त्यांच्या बांग देण्यामुळेच सूर्य उगवतो आणि जगात उजेड पडतो.
अमित शाहंच्या 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर हशा पिकला - अधीर रंजय चौधरी यांनी एवढे म्हणताच, अमित शाह यांनी सभापतींकडे बोलण्याची परवानगी मागितली. यानंतर शाह म्हणाले, जेव्हा एखाद्या मंत्र्याचे भाषण संपते तेव्हा मुद्दे त्याच्याशी संबंधित असायला हवे. अधीर यांना माझ्या भाषणाच्या एखाद्या मुद्द्यावर बोलायचे असेल तर बोलावे. मंत्र्याच्या भाषणानंतर 'मुर्गी-अंडा-मुर्गी' येत नाही. शाह यांनी अधीर यांच्यावर केलेल्या या पलटवारानंतर लोकसभेत एकच हशा उडाला.
तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते -तत्पूर्वी, आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांनी काश्मिरातील मोबाईल सेवेवरूनही अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला चढवला होता. "तुम्ही आम्हाला विचारत आहात? तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते आणि तेही 20 वर्षांसाठी बंद केले होते. त्यावेळी सर्व अधिकार कुठे गेले होते?," असा सवाल शाह यांनी केला.
इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद
ओवेसींवरही हल्ला -जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर बोलताना शाह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. "तुम्ही अधिकाऱ्यांचे हिंदू मुस्लीम म्हणून विभाजन करत आहात. तुमच्या मनात प्रत्येक गोष्ट हिंदू मुस्लीम आहे. मी तर तुम्हाला समजतो. एक मुस्लीम अधिकारी हिंदू जनतेची आणि हिंदू अधिकारी मुस्लीम जनतेची सेवा करू शकत नाही का? अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असे विभागून तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता का?," असा टोला शाह यांनी ओवेसींनाही लगावला.