नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, पक्षातील आणि विरोधी पक्षांतील अनेक छोटे-मोठे नेते, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अमित शाह लवकरात लवकर ठणठणीत व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
जेपी नड्डा -भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत अमित शाह लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे, ''माननीय गृहमंत्री अमित शाह कोरोना संक्रमित झाल्याचे वृत्त समजले. मी ईश्वराकडे ते लवकरात लवक बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.''
राजनाथ सिंह -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘’अमितजी, प्रत्येक आव्हानात आपली दृढता आणि इच्छाशक्ती एक उदाहरण राहिली आहे. कोरोना व्हायरसच्या या मोठ्या आव्हानावरही आपण निश्चितपणे विजय मिळवाल, असा मला विश्वास आहे. आपण लवकरात लवकर बरे व्हावे, हीच माझी इश्वराकडे प्रार्थना आहे.’’
नितिन गडकरी -केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी, अमित शाह यांच्या ट्विटला रिप्लाय करत म्हटले आहेत. ‘’आम्ही सर्वजण आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो.’’
अरविंद केजरीवाल -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले, ''मी गृहमंत्री अमित शाह लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.''
राहुल गांधी -राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे, ‘’अमित शाह लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.’’
शिवराज सिंह चौहान - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''अमित शाह जी, ईश्वर आपल्याला लवकरात लवकर पूर्णपणे ठणठणीत करो आणि आपण पूर्ण शक्तीनीशी देश सेवेच्या कार्यात येवोत. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत.''
ममता बॅनर्जी -ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे, 'केंद्रीयगृह मंत्री अमित शाह जी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ते लवकरात लवकर बरे होवोत, ही प्रार्थना. माझ्या सदिच्छा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत!'
महत्त्वाच्या बातम्या -
Happy Friendship Day: इस्रायलनं 'हे' खास बॉलीवुड सॉंग ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...