नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुद्द अमित शहा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. पण आता त्यांची प्रकृती ठीक असून एक किंवा दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपाच्या अनिल बलुनी यांनी दिली आहे.
शहा यांना स्वाइन फ्लूच्या उपचारांसाठी बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शहा यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना बलुनी यांनी सांगितले की, ''भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना एक ते दोन दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार.
हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एम्स संचालक रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचे एक पथक अमित शहांवर उपचार करत आहे.