"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:06 PM2024-09-30T13:06:12+5:302024-09-30T13:07:45+5:30
गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले होते.
काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी त्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, त्यांनी (खर्गे यांनी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या प्रकृतीच्या बाबतीत निष्कारण ओढले. यासंदर्भात सोमवारी एक्सवर लिहिताना शाह म्हणाले, काँग्रेसच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत किती द्वेश आणि भीती आहे, हे खर्गे यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. ते सातत्याने त्यांच्याच बाबतीत विचार करत असतात.
गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले होते.
"खर्गे यांनी आपला पक्ष आणि नेत्यांनाही मागे टाकले"-
अमित शाह म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या भाषणात अपशब्द वापरून आपले नेते आणि पक्षालाही मागे टाकले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्ल कटूतेचे प्रदर्शन करत, त्यांना आपल्या आरोग्याच्या मुद्द्यावर विनाकारणच ओढले आणि म्हणाले की, पंतप्रधानांना सत्तेवरून हटवूनच शांत होऊ.
शाह म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांच्या प्रकृतीचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी, मी आणि आम्ही सर्वजण, प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभावे, ते निरोगी राहावेत, ते अनेक वर्षापर्यंत जिवंत रहावेत आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे निर्माण बघण्यासाठी जिवंत रहावेत.
तत्पूर्वी, खर्गे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसाध्यक्षांना फोन करून, प्रकृतची विचार-पूस केली होती.