नवी दिल्ली, दि. 2 - विरोधकांच्या बालेकिल्ल्यात निवडणुकींमध्ये खिंडार पाडून आपल्या पक्षाचा झेंडा रोवणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आता नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. फेसबुकवर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येनं एक कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. यासंबंधी भाजपाने ट्विट करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना फेसबुकवर सर्वाधिक फॉलो केले जाते. या आकड्यांनुसार, अमित शाह फेसबुकवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे देशातील दुसरे राजकीय नेते आहेत.
तर यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांचे फेसबुकवर सर्वाधिक म्हणजे 4 कोटी 26 लाख फॉलोअर्स आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे फेसबुकवर 1 कोटी 20 हजार फॉलोअर्स आहेत. कोटींच्या घरात फेसबुकवरील फॉलोअर्संचा आकडा पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी फॉलोअर्सचे आभार मानले. तुम्हा सर्वांचे प्रेम तसेच सहकार्यासाठी मनापासून आभार, असे ट्विट करुन अमित शाह यांनी केले आहे. भाजपाचे अध्यक्ष ट्विटवरदेखील प्रचंड सक्रीय आहेत. ट्विटरवर त्यांचे जवळपास 58 लाख 89 हजार फॉलोअर्स आहेत.
अमित शाह एक सक्रीय राजकारणी असून सध्या ते मिशन 2019 साठी 100 दिवसांचा राष्ट्रव्यापी दौरा करत आहेत. ज्या ठिकाणी भाजपा अपेक्षेनुसार अद्यापही कमकुवत आहे, अशा राज्यांत व क्षेत्रांवर अमित शाह या दौ-यात लक्ष्य केंद्रीत करत आहेत.
Congratulations to BJP President Shri @AmitShah for crossing 1 Crore likes on Facebook, the only second Indian politician to achieve this. pic.twitter.com/zrC4WVKYs1
— BJP (@BJP4India) August 1, 2017
आप सभी के स्नेह एवं सहयोग के लिए हृदय से आभार।