'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:28 PM2024-09-19T15:28:59+5:302024-09-19T15:29:55+5:30

Amit Shah in J&K : पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमित शाह संतापले.

Amit Shah in J&K: 'One agenda of Congress and Pakistan', Amit Shah strongly criticized on the issue of Article 370 | 'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

Amit Shah in J&K :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 370 च्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. यावरुन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देशविरोधी शक्तींसोबत काँग्रेसचा : अमित शहा
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्याने काँग्रेस पुन्हा एकदा एक्सपोज झाली आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानचा हेतू आणि अजेंडा एकच आहे. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी देशवासियांच्या भावना दुखावत सर्व भारतविरोधी शक्तींसोबत उभे आहेत. एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणे असो किंवा भारतीय लष्कराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे असो, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान नेहमीच एकाच बाजूने राहिले आहेत. पण, काँग्रेस आणि पाकिस्तान विसरले की, केंद्रात मोदी सरकार आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये कलम 370 किंवा दहशतवाद परतणार नाही.'

काय म्हणाले पाकचे संरक्षण मंत्री?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तेथील एका टीव्ही छॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान काँग्रेस आणिनॅशनल कॉन्फरन्ससोबत आहे. कलम 370 बाबत काँग्रेस आघाडीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. मला वाटतं, हे शक्य आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांची ताकद आहे. काश्मीरमधील लोकही या मुद्द्यावर खूप उत्सुक आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित बातमी-  जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

काँग्रेसचे मौन 
नॅशनल कॉन्फरन्सने सत्तेत आल्यास कलम 370 पुनर्स्थापित करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असला तरी, काँग्रेसने अद्याप यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले असले तरी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख केलेला नाही.

ओमर अब्दुल्ला यांचे पाकला प्रत्युत्तर 
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम 370 वर पाकिस्तानी नेत्याच्या टिप्पणीला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'पाकिस्तानने आधी स्वत:ची काळजी घ्यावी. त्यांनी आमच्या निवडणुकीवर भाष्य करू नये. आमचा पाकिस्तानशी काय संबंध, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यात हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही.'

Web Title: Amit Shah in J&K: 'One agenda of Congress and Pakistan', Amit Shah strongly criticized on the issue of Article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.