वेल्लोर: केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजप नेते देशभरात विविध ठिकाणी सभा घेत आहे. यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये सभा घेतली. यावेली त्यांनी तामिळनाडूतीलकाँग्रेस-द्रमुक सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्याचबरोबर ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षात पंतप्रधान मोदी सरकारवर कोणीही भ्रष्टाचाराचा एकही आरोप केलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर भारताची प्रतिष्ठा वाढवली. भारताला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्याचे कामही सरकारने केले आहे, असं शहा यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. शह म्हणाले की, द्रमुक-यूपीए 10 वर्षे सरकारमध्ये होते, त्याआधीही ते 8 वर्षे सत्तेत होते, परंतु येथील विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या परीक्षा तामिळ भाषेत लिहू देण्यात आल्या नाहीत. आता इंडिया सर्व्हिसेस, एनईईटी, सीएपीएफ परीक्षांसह सर्व प्रमुख परीक्षा तमिळ भाषेत घेतल्या जात आहेत.
शहांनी यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरले. शहा म्हणाले की, राज्यातील काँग्रेस-द्रमुक सरकारवर 12 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यावेळी त्यांनी आठवण करून दिली की, गेल्या 9 वर्षात मोदी सरकारवर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मोदी सरकारने नुकतेच नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये तमिळनाडूच्या चोल साम्राज्याचे सेंगोल स्थापित करण्यात आल्याचेही शहांनी यावेळी सांगितले.
गंगा-जमुना संस्कृतीवर भर देताना शहा म्हणाले की, अलीकडेच काशी आणि सौराष्ट्रमध्ये तमिळ संगमचे आयोजन करण्यात आले होते. तमिळनाडूची समृद्ध संस्कृती आणि साहित्य गुजरात आणि उत्तर प्रदेशातील लोकांपर्यंत पोहोचावे, हा या कार्यक्रमांमागील पंतप्रधान मोदींचा उद्देश आहे. चेन्नई बेंगळुरू एक्स्प्रेससाठी मोदी सरकारने 50 हजार कोटी दिले होते. त्याचबरोबर चेन्नई मेट्रोच्या फेज 1 आणि फेज 2 साठी केंद्राने 72 हजार कोटी रुपये दिल्याचेही शहांनी सांगितले.