शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

"आयुष्मान CAPF योजनेचा शुभारंभ, 10 लाख जवानांना होणार फायदा"; अमित शहांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 10:58 AM

Ayushman CAPF Healthcare Scheme : अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची (Ayushman CAPF Healthcare Scheme) घोषणा केली आहे. अमित शहा सध्या आसामच्या दौऱ्यावर असून शनिवारी गुवाहाटी येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आयुष्मान सीएपीएफ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

आयुष्मान सीएपीएफ योजनेअंतर्गत 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या 50 लाख कुटुंबीयांनाही देशातील 24 हजार रुग्णालयांमध्ये उपचार मिळू शकणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. "आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करण्यासाठी सीएपीएफच्या सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा आजचा चांगला दिवस आहे. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' अशी घोषणा देऊन त्यांनी तरुणांमध्ये जोश भरला होता" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

"सीएपीएफचे जवान कोरोनाविरूद्धच्या लढाईत आघाडीवर उभे होते. याच दरम्यान काही जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला. अनेकांनी आपला जीव देखील गमावला. या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सर्व जवानांचं अभिनंदन करतो. या योजनेतून सीएपीएफच्या जवानांना उपचारासाठी हॉस्पिटल्समध्ये फक्त कार्ड स्वॅप करावं लागेल" असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सैन्याला 1 लाख बुलेट प्रूफ जॅकेट  (Bullet Proof Jackets) दिले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्याकडे भारतात तयार करण्यात आलेली बुलेट प्रूफ जॅकेट्स सोपवली.

अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी

विशेष म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट्स हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून मेक इन इंडिया (Make in India) या योजनेअंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान श्रीपाद नाईक यांनी आम्ही लष्कराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. बुलेट प्रूफ जॅकेट्सची वेळेआधीच डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी आपल्या सैनिकांची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी शस्र आणि सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे" असं श्रीपाद नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाHealthआरोग्यIndiaभारतPoliceपोलिसAssamआसामBJPभाजपा