शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

‘बिहारमध्ये कमळ फुलणार; नितीश कुमारांसाठी BJPचे दरवाजे कायमचे बंद' अमित शहा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 5:23 PM

Amit Shah In Bihar: 'नितीश कुमार कधीच पंतप्रधान होणार नाहीत आणि तेजस्वी यादवला कधीच मुख्यमंत्री बनू देणार नाहीत.'

Amit Shah On Nitish Kumar: गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहार दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. शहा यांनी आज बिहारच्या नवादा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला भाजपच्या हाती सत्ता देण्याची आवाहनही केले.

नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंदयावेळी अमित शहा यांनी नितीश कुमारांबाबत एक मोठे वक्तव्य केले. नितीश कुमार आणि लल्लन सिंह यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, 'तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल, पण आता हे विसरुन जा. तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मी बिहारच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही यापुढे कधीच नितीश कुमार यांच्याशी युती करणार नाही."

भाजपच्या हाती सत्ता देण्याचे आवाहनअमित शहा पुढे म्हणाले, 'आज मला सासाराममध्ये महान सम्राट अशोकासाठी आयोजित कार्यक्रमात जायचे होते, पण तिथे हिंसाचार झाल्यामुळे जाऊ शकलो नाही. मी इथूनच सासारामच्या लोकांची माफी मागतो आणि लवकरच येईन, असे आश्वासन देतो. मी बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की, 2024 मध्ये बिहारमधून भाजपला 40 जागा द्या आणि 2025 मध्ये भाजपचे सरकार बनवा. राज्यात दंगलखोरांना उलटे टांगून सुतासारखे सरळ केले जाईल,' असेही ते यावेळी म्हणाले.

लालू यादव यांना दिला सल्ला“नितीश बाबू, सत्तेच्या लालसेने तुम्हाला लालूजींच्या मांडीवर बसण्यास भाग पाडले. असे स्वार्थी सरकार मी पाहिलेले नाही. एका व्यक्तीला पंतप्रधान व्हायचे आहे आणि लालूजींच्या मुलाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी लालूजींनाही सांगायला आलो आहे. लालूजी, नितीश जी पंतप्रधान होणार नाहीत आणि नितीश जी तुमच्या मुलाला कधीच मुख्यमंत्री बनवणार नाहीत. बिहारमधील सर्व 40 जागांवर कमळ फुलणार असल्याचे बिहारच्या जनतेने ठरवले आहे. आम्ही बिहारमधून महाआघाडीचे सरकार उखडून टाकू,' असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव