शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
2
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
3
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
4
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
5
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
6
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
7
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
8
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
9
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
10
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
11
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
12
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
13
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
14
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
15
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
16
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
17
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
18
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
19
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
20
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

"दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:22 IST

शाह काँग्रेसवर थेट हल्ला करताना म्हणाले, "वक्फ विदेयकावर 2013 मध्ये जे संशोधन आले, ते आले नसते, तर आज हे संशोधन आणण्याची गरज पडली नसती. त्यावेळी काँग्रेस सरकारने दिल्लीतील 125 लुटियन्स मालमत्ता वक्फला दिल्या. उत्तर रेल्वेची जमीन वक्फला देण्यात आली. हिमाचलमध्ये वक्फ जमीन असल्याचा दावा करून एक मशीद बांधण्यात आली."

वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment  Bill)  आज (02 अप्रैल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए पूर्णपणे तयारीत आहे. या विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, दान आपल्या संपत्तीचे केले जाऊ शकते. सरकारी जमिनींचे नाही. ते म्हणाले वक्फ एक प्रकारचे चॅरिटेबल एंडोरमेंट आहे. यात व्यक्ती पवित्र दान करते. दान अशाच गोष्टीचे केले जाते जी आपली आहे. सरकारी मालमत्ता अथवा इतर कुणाच्या मालमत्तेचे दान करता येत नाही. ही संपूर्ण चर्चा याच मुद्द्याव आहे.

लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मी या विधेयकाच्या बाजूने बोलत आहे. मला वाटते, एक तर निर्दोष भावनेने अथवा राजकीय कारणांमुळे सदस्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत आणि ते पसरवण्याचे कामही सुरू आहे. मी काही गोष्टरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. वक्फ एक अरबी शब्द आहे. याचा इतिहास काही हदीसशी संबंधित सापडतो. आज ज्या अर्थाने वक्फ शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ आहे अल्लाहच्या नावावर मालमत्तेचे दान. आम्ही आज जो अर्थ समजत आहोत, तो इस्लाम चे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात अस्तित्वात आला."

शाह काँग्रेसवर थेट हल्ला करताना म्हणाले, "वक्फ विदेयकावर 2013 मध्ये जे संशोधन आले, ते आले नसते, तर आज हे संशोधन आणण्याची गरज पडली नसती. त्यावेळी काँग्रेस सरकारने दिल्लीतील 125 लुटियन्स मालमत्ता वक्फला दिल्या. उत्तर रेल्वेची जमीन वक्फला देण्यात आली. हिमाचलमध्ये वक्फ जमीन असल्याचा दावा करून एक मशीद बांधण्यात आली." यावेळी शाह यांनी, तामिळनाडूपासून कर्नाटकपर्यंतची काही उदाहरणे दिली ज्यावर विरोधकांनी गदारोळ केला आणि त्यांच्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाwaqf board amendment billवक्फ बोर्डcongressकाँग्रेसMuslimमुस्लीम