नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे. गृहमंत्र्यांच्या मते, या ओळखपत्रात पासपोर्ट, आधार आणि व्होटर आयडी कार्ड यांचा अंतर्भाव असणार आहे. अमित शाह यांनी देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची शिफारस करत 2021ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्याचं सांगितलं आहे.ते म्हणाले, आधार, पासपोर्ट, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डात असणं गरजेचं आहे. त्यासाठीही अमित शाहांनी हा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, एक अशी व्यवस्था असली पाहिजे, ज्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ऑटोमेटिक पद्धतीनं त्याची माहिती लोकसंख्येच्या डेटामध्ये अपडेट होईल, आम्हाला एक असं कार्ड आणायचं आहे, जे सर्व गरजा जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक अकाऊंट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी पूर्ण करेल.
Census 2021 : अमित शाहांनी दिला नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट, DLचं करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:51 PM