शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

UP Election 2022 : शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् दरवर्षी 2 सिलिंडर मिळणार फ्री, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 1:01 PM

UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) भाजपने आज (मंगळवार) संकल्प पत्र (Samkalp Patra) म्हणजेच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रात सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोचिंगची व्यवस्था केली जाईल.

युवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आयटीआय स्थापन करण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी होळी आणि दीपावलीच्या दिवशी 2 मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. विधवा आणि निराधार महिलांसाठी निवृत्ती वेतन दरमहा 1,500 रुपये करण्यात येणार आहे, असे अमित शाह म्हणाले. 

आज मला 5 वर्षांपूर्वीचे दृश्य आठवते. हीच जागा होती, तेव्हा भाजपने जाहीरनामा जनतेसमोर ठेवला होता. तेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष होतो. 2014 मध्येच जनतेने सांगितले होते की 2017 मध्ये यूपीमध्ये भाजपचे सरकार बनणार आहे. 2014 मध्ये भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या आणि 2017 मध्ये विधानसभेच्या 300 पेक्षा जास्त जागा लोकांनी जिंकल्या, असे अमित शाह यांनी सांगितले. 

तसेच, अमित शाह म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचा विकास प्रत्येक क्षेत्रात झाला. गुन्हेगारांना आज राजकारणात स्थान नाही. मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारीमुक्त करण्याचे काम केले आहे. त्यांनी प्रशासनाचे राजनीतीकरणही थांबवले. 2017 च्या जाहीरनाम्यात 212 संकल्प होते, त्यापैकी 92 टक्के संकल्प पूर्ण झाले आहेत. यावेळी पुन्हा भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे, असे अमित शाह म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे 86 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे काम केले, असे अमित शाह म्हणाले. याचबरोबर, पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश हे दंगायुक्त राज्य म्हटले जात होते. बहिणी-मुली सुरक्षित नव्हत्या. भाजप सरकारच्या पाच वर्षानंतर राज्यातून गुन्हेगारांचे स्थलांतर झाले आहे. लुटमारीच्या घटनांमध्ये 57 टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये 42 टक्के घट झाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Amit Shahअमित शाहBJPभाजपा