शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Farm laws Repeal: “कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 6:51 PM

Farm laws Repeal: कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान मोदींनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे.

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केले. परंतु, शेतकरी आंदोलन यापुढेही सुरूच राहील. लगेच ते मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मांडली. तर, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका विरोधकांनी केली. यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांनी ट्विटर करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले. 

पंतप्रधान मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी यासाठी ‘गुरुपूरब’ हा खास दिवस निवडला. त्याच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, हेही यातून दिसून येते. त्यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, असे ट्विट अमित शाह यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते, असे ट्विट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी करत या निर्णयाला पाठिंबा दर्शवला

भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो

पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन