शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 11, 2021 8:22 PM

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. (Citizen Amendment Act)

नवी दिल्ली - कोरोना लसिकरण कार्यक्रम (Corona vaccination) संपल्यानंतर, सीएए (CAA) अंतर्गत शरणार्थ्यांना नागरिकता द्यायला सुरुवात केली जाईल, असे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्पष्ट केले. ''सीएएच्या मुद्यावर विरोधक अल्पसंख्यकांची दिशाभूल करत आहेत. भारतीय अल्पसंख्यकांच्या नागरिकत्वावर याचा काहीही परिणाम होणार नाही,'' असे शाह यांनी म्हटले आहे. ते मतुआ समुदाय बहुल असलेल्या ठाकुरनगर भागात एका सभेला संबोधित करत होते. (Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends)

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी (Mamata Banerjee) म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. लसिकरणाचा कार्यक्रम संपताच आणि कोरोनापासून मुक्ती मिळताच, भाजप आपल्या सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.''

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

आता ममता बॅनर्जी सीएएला लागू करण्याला विरोध करण्याच्या स्थितीत नसतील. कारण विधानसभा निवडणुकीनंतर त्या मुंख्यमंत्री नसतील. मोदी सरकारने 2018 मध्येच नवा नागरिकता कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते आणि 2019 मध्ये भाजप सत्तेवर येताच, हे आश्वासन पूर्ण करण्यात आले, असेही शाह म्हणाले.

...तेव्हा ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम'यापूर्वी अमित शाह यांनी कूचबिहार येथील जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल