शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

बिहारच्या 'बाहुबली' मित्राला अमित शाहांनी दिला 'शॉक', पत्ता कापला; आता २०२४ मध्ये भाजपा सीट काढून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 3:49 PM

बिहारच्या बाबतीत अमित शाह सध्या नव्या रणनितीवर काम करत आहेत. प्रत्येक सीटवर लक्ष देऊन राजकीय गणित मांडत आहेत.

पाटणा/नवादा- 

बिहारच्या बाबतीत अमित शाह सध्या नव्या रणनितीवर काम करत आहेत. प्रत्येक सीटवर लक्ष देऊन राजकीय गणित मांडत आहेत. लक्ष्य फक्त नितीश कुमार यांना पराभूत करणं हेच आहे. यासाठी कुणाचाही राजकीय बळी द्यावा लागला तरी भाजपा तयार आहे. नवादा लोकसभा मतदारसंघ याच पेचात आला आहे. रिपोर्टनुसार नवादाच्या जागेवर २०२४ मध्ये भाजपा निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत. २०१९ मध्ये या जागेवरून बाहुबली सुरजभान सिंहचा भाऊ चंदन सिंह हे लोक जनशक्ती पक्षाकडून विजयी झाले होते. ते सध्या या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहे. पण आता या जागेवर भाजपाचं लक्ष गेलं आहे. 

नवादामधून सुरजभानच्या भावाचा पत्ता कट?नवादा येथील खासदार बाहुबली सूरजभान सिंह यांचा भाऊ चंदनसिंहचा पत्ता साफ झाला आहे असं मानलं जात आहे. कारण बिहार दौऱ्यात अमित शाह यांनी मोठा धक्का दिला आहे. नवादा येथे रविवारी भारतीय जनता पक्षातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अमित शाह म्हणाले की २०२४ मध्ये या जागेवरून लढण्याची तयारी करा. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत नवादा येथून निवडणूक लढवणार आहे. प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी अमित शाह हिसुआ येथे पोहोचले होते.

शाहा यांनी भाषणापेक्षा बैठकीला जास्त वेळ दिलानवादा सभेपूर्वी अमित शहा यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नेत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अमित शाह ज्या ठिकाणी सभा घेणार होते, त्याच्या जवळच ही बैठक निश्चित करण्यात आली होती. अमित शहा यांनी भाषणापेक्षा या सभेसाठी जास्त वेळ दिल्याचं बोललं जातं. स्थानिक नेत्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर ते म्हणाले की, भाजपा नवादा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, तुम्ही तयारीला लागा.

अमित शाहांच्या 'टार्गेट ९०'मध्ये नवादाचा समावेशभाजपच्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी देशातील लोकसभेच्या ९० जागांची जबाबदारी स्वत: घेतली आहे. या जागांची तयारी खुद्द अमित शाहा पाहत असून, नवादा मतदारसंघाचाही समावेश याच ९० मतदार संघांमध्ये झाला आहे. अमित शाहा आपल्या पुढील बिहार दौऱ्यात नवादा येथील सर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचं समजतं. म्हणजेच सूरजभान सिंह आणि त्यांचे खासदार भाऊ चंदन सिंह यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

सूरजभान कोटा मुंगेरी सीटवर शिफ्ट होणार?२०१४ मध्ये भाजपाचे गिरीराज सिंह नवादामधून खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये जागांच्या अदलाबदलीत नवादा ही जागा एलजेपीला आणि मुंगेरची जागा जेडीयूला देण्यात आली. गिरीराज सिंह यांना बेगुसराय येथे हलवण्यात आलं होतं. आता जेडीयू भाजपपासून वेगळी झाली आहे, त्यामुळे आता मुंगेरची जागा एलजेपीला (पारस गट) देऊ शकते. सूरजभान यांच्या पत्नी वीणा देवी यापूर्वी खासदार राहिल्या आहेत. सध्या सूरजभान यांचे भाऊ चंदन सिंह हे एलजेपी (पारस गट) कडून नवादाचे खासदार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBiharबिहार