वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले आहे. आता राज्यसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कायद्यातील चुका दुरुस्त करणे ठीक आहे, परंतू प्रतिष्ठेचे करू नका, असे म्हटले आहे. तर भाजपाच्या सुधांशु त्रिवेदी यांनी आजवर जे जे गुंड प्रवृत्तीचे लोक मारले गेले ते सर्व इंडी आघाडीचे होते, असा आरोप केला. यावर शरद पवार गटाच्या फौजिया खान यांनी आक्षेप घेतला. यानंतर अमित शाह बोलायला आले. यावेळी त्यांनी दिग्विजय सिंग यांनाच पट्ट्यात घेतले.
इशरत जहाँ, अतीक अहमद, मुख्तार अन्सारी हे लोक कोण होते, आज मुस्लिम यांच्या सोबत आहेत, असे वक्तव्य त्रिवेदी यांनी केले. यावर आक्षेप आल्याने अमित शाह बोलायला उठले. सुधांशु यांनी हे लोक इंडी अलायन्सचे होते, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीने इशरतच्या घरी जाऊन बक्षीस दिले आणि ती शहीद झाल्याचे म्हटले होते. अतीक अहमद इंडी अलायन्सचा, मुख्तार अन्सारी तो देखील इंडी अलायन्सचा. ही सर्व नावे इंडी अलायन्सशी जोडलेली आहेत, असे शाह म्हणाले.
यानंतर त्रिवेदी यांनी अफझर गुरुच्या अंत्ययात्रेला किती मुस्लिम होते, किती लोक अब्दुल कलाम यांच्या अंत्ययात्रेला आलेले. एक खासदार तर असे सांगत होते की अफजलची न्यायपालिकेने हत्या केली, असे बोलताच दिग्विजय सिंग यांना मिरच्या झोंबल्या. त्यांनी माझ्या संबंधात जे बोलले गेले त्याचा मी निषेध करत असल्याचे म्हटले. यावेळी पुन्हा शाह यांची एन्ट्री झाली. त्यांनी यांचा माईक सुरु करा, सांगुद्या की २६-११ च्या हल्ल्यात संघाचा हात होता हे त्यांनी सांगितलेले की नाही.
यावर दिग्विजय सिंग यांनी या गोष्टी मी बोललेलो नाही. गृहमंत्र्यांनीच सांगावे की गुजरात दंग्यांवेळी ते कुठले गृहमंत्री होते, त्यांची काय भूमिका होती, असा सवाल शाह यांना केला. यावर शाह यांनी जेव्हा दंगल झाली त्याचा १८ महिन्यांनी मी गृह मंत्री झालो. यांना माझी एवढी धास्ती आहे की सगळ्या जागी मीच दिसतो, असा टोलाही शाह यांनी लगावला.