Amit Shah Rally : मधुबनी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील मधुबानीमध्ये एका प्रचारसभेत जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "याआधी या भागात गोहत्येची प्रकरणे समोर येत होती. तुम्ही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, आम्ही गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करण्याचे काम करू."
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "इंडिया आघाडीचे लोक आज म्हणतात की, पीओकेबद्दल बोलू नका, पाकिस्तानजवळ अणू बॉम्ब आहे. मला त्यांना सांगयचे आहे की, तुम्ही पाकिस्तानच्या अणू बॉम्बची भीती बाळगला. मोदींच्या नेतृत्वात भारत इतका मजबूत आहे की, कोणालाही अणू बॉम्बची भीती वाटण्याची गरज नाही. तसेच, पीओके आमचा आहे आणि आम्ही तो घेऊ असे सांगून मी आज येथून जात आहे."
पुढे रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, "नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले अत्यंत मागासलेले पंतप्रधान आहेत. ५०-६० च्या दशकात लोहियाजींचा सिद्धांत देशात चालेल की नाही, यावर चर्चा होत होती. आज मला लोहियाजींना अभिवादन करायचे आहे आणि सांगायचे आहे की, सर्वात मागासलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे."
कर्पूरी ठाकूर यांच्यावरून आरजेडीवर निशाणाआरजेडीवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले, "मला लालू यादव यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही बिहारमध्ये १५ वर्षे आणि केंद्रात १० वर्षे मुख्यमंत्री आणि मंत्रीपद भूषवले. कर्पूरी ठाकूर यांना तुम्ही कधीच भारतरत्न देऊन सन्मानित केले नाही. मोदींनी नुकतेच कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. कर्पूरी ठाकूरजींनी केवळ बिहारच नव्हे तर संपूर्ण देशातील दलित, वंचित, आदिवासी, मागास, माता आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले."