देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. देशभरात सर्व पक्षीय नेत्यांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात तयारी करत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजप नरेंद्र मोदी यांच्या नावाचा पंतप्रधान म्हणून प्रचार करत आहे, मात्र पंतप्रधान मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा नवा चेहरा कोण असणार या चर्चा जोरदार सुरू आहेत.
ग्रीसमध्ये नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात स्वागत, पाहा PHOTOS
एका सर्वेक्षणात मोदींनंतर या पदासाठी सर्वात मोठे नाव सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे समोर आले आहेत. या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या दिग्गजांचाही समावेश असले तरी, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २९ टक्के लोकांनी शाह यांना पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पसंती दिली आहे.
या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २६ टक्के लोकांना त्यांना पंतप्रधानपदावर पाहायचे आहे. याशिवाय १५ टक्के लोक गडकरींच्या बाजूने असल्याचे दिसत आहेत.
सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए लोकसभेच्या ३०६ जागा जिंकू शकेल. बहुमताचा आकडा २७२ आहे. तर नवीन आघाडी I.N.D.I.A १९३ जागा जिंकू शकते. तर, ४४ इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. भाजपला २८७ जागा मिळू शकतात, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. मात्र, सर्वेक्षणात काँग्रेसला फक्त ७४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.