शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:52 AM

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सरकारमध्ये क्रमानुसार तिसरे नेते असले तरी त्यांचा केंद्रस्थानी वाढता प्रभाव आहे. सरकार आणि पक्षसंघटनेसोबत संसदीय कामकाज मार्गी लावण्यातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. वरिष्ठ नेते अरुण जेटली यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत असली तरी तत्पर निर्णय, व्यावहारिक समंजसपणा आणि स्पष्ट भूमिकेने अमित शहा हे प्रभावी ठरले आहेत. सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर अधिकारवाणीने बोलणारे एकमेव केंद्रीय मंत्री नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब होऊ नये, यासाठी विरोधकांशी सामंजस्याने संवाद साधून त्यांचे मन वळविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या या पुढाकाराने ठरविण्यात आलेल्या रणनीतीमुळे तीन तहकुबीननंतर राज्यसभेचे कामकाज सुरळीत होईल. वृत्तांकनासाठी नियमितपणे येणाºया काही पत्रकारांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये आम्हाला प्रवेशबंदी घालणार का? असा थेट सवाल केला असता अमित शहा म्हणाले की, ‘मी उदार मनाचा आहे. असले निर्बंध घालणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती कोणताही मंत्री देणार नाही; परंतु अमित शहा यांनी मोघम न बोलता असला प्रकार आपणास मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विधेयके सादर करण्यासाठी, तसेच त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्या कनिष्ठ सहकारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिले. अशावेळी सभागृहात हजर राहून त्यांनी गरज पडल्यास चर्चेत हस्तक्षेपही केला. त्यांची ही पद्धत पाहून अन्य वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचा हा कित्ता गिरवणे सुरू केले.

संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी आपल्या कनिष्ठ मंत्र्यांना उत्तरे देण्याची संधी दिली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय किंवा जी. कृष्णा रेड्डी यांनाही खासदारीकच्या पहिल्याच कारकीर्दीत आपल्यावर एवढी महत्त्वाची कामगिरी सोपविली जाईल, अशी कल्पनाच केली नसावी.जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्याचा एकमेव प्रस्ताव त्यांनी संसदेत सादर केला. काश्मीर, एनआरसीचा मुद्दा सोडवून पश्चिम बंगाल जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारच्या पहिल्या ५० दिवसांत गृहमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटविला. आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणारे अमित शहा यांचे व्यक्तिमत्त्व असले तरी पत्रकारांनी संकेत पाळल्यास ते संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात गप्पागोष्टी आणि विनोदातही रमतात.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाlok sabhaलोकसभा