हरिश गुप्ता ।नवी दिल्ली : कर्नाटकात सरकार स्थापन करण्यात अपयश आले असले तरी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता पुडुच्चेरीवरलक्ष्य केंद्रित केले आहे. तेथील काँग्रेसचे सरकार त्यांना खाली खेचायचे आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाह जुलैमध्ये पुडुच्चेरीला जाणार आहेत.तेथील काँग्रेसचे व्ही. नारायणस्वामी यांचे सरकार क्षीण बहुमतावर उभे असून, ते पडावे, असे ते गेले पाहिजे, असे शहा यांचे प्रयत्न आहेत. तेथील ३० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार असून, द्रमुकच्या दोन आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे.काँग्रेसच्या ताब्यातून पुुडुच्चेरी गेल्यास त्या पक्षाकडे केवळ पंजाब राहील आणि कर्नाटकात जनता दल (एस) या कनिष्ठ सहकारी पक्षाच्या साह्याने ते सत्तेत राहतील. पुडुच्चेरीमध्ये काँग्रेसेतर पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी काय करता येईल, यावर रात्री शाह यांनी प्रमुख तेथील एआयएनआरसी या विरोधी पक्षाचे अध्यक्ष एन. रंगास्वामी यांच्याशी नुकतीच चर्चा केली.तिथे एआयएनआरसीचे आठ आमदार असून अण्णा द्रमुकच्या चार व एका अपक्ष आमदाराचा त्यांना पाठिंबा आहे. अर्थात ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही.राज्यपालनियुक्त आमदार भाजपामध्येपरंतु केंद्रशासित पुड्डेचेरीमध्ये राजकीय परिस्थिती बदलली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी विधानसभेवर नियुक्त केलेल्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला व यामुळे एकत्रित विरोधकांकडील आमदारांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे या सर्व आमदारांच्या जोरावर नारायणस्वामी यांचे सरकार पाडण्याचा डाव भाजपाने आखला आहे.
अमित शहांचे लक्ष्य आता पुडुच्चेरी; अन्य पक्षांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:43 AM