एस.पी.सिन्हा, पाटणाभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाटण्याच्या मोईनुल हक स्टेडियमवर योगा न करताच लोकांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव पारित करून देशाचा गौरव वाढविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.योगानेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचाराला जन्म दिला आहे. आज भारत संपूर्ण जगाचा भाग बनत आहे. भारतीय संस्कृती आणि विचार जगाने स्वीकारला आहे, असे ते म्हणाले.टी-शर्ट आणि ट्रॅक सूट परिधान केलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांनी जेडीयूचे नेते शरद यादव आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली. योग दिवसाला ‘भोग दिवस’ म्हणणाऱ्यांना जनता सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी अणे मार्गावरील आपल्या शासकीय निवासस्थानी योग कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर त्यांनी हा बंगला रिकामा केला.
अमित शहांचा भाषण‘योग’
By admin | Published: June 22, 2015 12:20 AM