मर्गेऱ्हिता (आसाम) : काँग्रेस आणि त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर देशात फूट पाडण्यासाठीच असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जोरदार हल्ला केला. शहा म्हणाले, “मतपेट्यांचे राजकारण भाजप करीत नाही.” (Amit Shah's strong attack on a public meeting in Assam, the Congress front with those who divide the country)
“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. राज्यसभेत आसाममधून डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिनिधित्व केले होते. अप्पर आसाममधील मर्गेऱ्हितात २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने आसाममध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दीन अजमल यांच्याशी, केरळमध्ये मुस्लीम लीगशी तर पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलरशी हातमिळवणी केली आहे, असे सांगून आसाम अजमल यांच्या हातात सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. आसामच्या कल्याणाची जास्त काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की बद्रुद्दीन अजमल यांना आहे याचा निर्णय जनता घेऊ शकते, असे शहा येथील प्रचार सभेत म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी मी भाजपचा अध्यक्ष असताना आसामला ‘आंदोलन मुक्त’ आणि ‘आतंक मुक्त’ करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही आमचे आश्वासन पाळले आणि राज्यात आता कोणतेही आंदाेलन नाही किंवा संघर्षही, असेही अमित शहा म्हणाले.