चेन्नई : तामिळनाडूमध्ये सरकारी वसतिगृहातील मुलींच्या हातावर मुख्यमंत्री जे. जयललिता (अम्मा) यांचे चित्र सक्तीने गोंदविण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे वित्तमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुलींच्या हातावर बळजबरीने ‘अम्मा’चा टॅटू गोंदविण्यात आल्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्यंतरी चेन्नईत महापूर आला होता तेव्हाही पुरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी विमानातून टाकण्यात आलेल्या अन्नाच्या पाकिटांवर ‘अम्मां’ची छबी छापण्यावरून वाद झाला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.विद्यार्थिनींच्या हातावर बळजबरीने ‘अम्मा’ टॅटू गोंदविण्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पनीरसेल्वन होते. या दोन्ही घटनांचा विरोधी पक्षांकडून तसेच बिगर सरकारी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.काही बिगर सरकारी संघटनांनी (एनजीओ) तर ‘अम्मा’ टॅटू सक्तीने गोंदविण्याच्या या प्रकाराविरुद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. दुसरीकडे सुंदरराजन यांनी गुरुवारी पुदुकोट्टई येथील एका शासकीय क्रीडा वसतिगृहाला सायंकाळनंतर भेट देऊन वसतिगृहातील सुविधांची ‘तपासणी’ केली. त्यांच्या या भेटीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
विद्यार्थिनींच्या हातावर गोंदविला ‘अम्मा’चा टॅटू
By admin | Published: March 07, 2016 3:10 AM