नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या कमी असून हेच चित्र राज्यातील खासगी मुक्त विद्यापीठे तसेच सरकार संचालित अभिमत विद्यापीठांमध्येही दिसून येत असल्याचे देशव्यापी सर्वेक्षणात आढळून आले आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले सर्वाधिक विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्र व तामिळनाडूचा क्रमांक लागतो.या २०१७-१८ च्या सर्वेक्षणाच्या अहवालाचे प्रकाशन केल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशात१८ ते २३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाºयांचे ठोकळ प्रवेश प्रमाण २५.८ टक्के आहे.उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३. ६६ कोटी असून त्यामध्ये १.९२ कोटी मुले व १.७४ कोटी मुली आहेत. म्हणजे उच्च शिक्षण घेणाºयांमध्ये मुलींचे प्रमाण ४७.६ टक्के आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अनुक्रमे २१.८ व १५.९ टक्के आहे.सन २०१७मध्ये ३४ हजार विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली. त्यामध्ये २०१७९ पुरुष व १४२२१ महिलांचा समावेश होता. विज्ञान व त्यापाठोपाठ अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयांत पीएचडी करणाºयांची संख्या जास्त आहे.उच्च शिक्षणात सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासक्रमांतील विद्यार्थी आहेत.विदेशीही लक्षणीयउच्च शिक्षणसंस्थांमध्ये ४६११४ विदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात १० महत्त्वाच्या देशांतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ६३.४ टक्के इतकी आहे.उच्च शिक्षणाचे खरे चित्र समजून घेण्यासाठी २०११पासून हे सर्वेक्षण केले जाते.
उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:35 AM