राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:03 PM2023-07-23T12:03:24+5:302023-07-23T12:07:25+5:30

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत.

Among Rahul Gandhi, Mamata Banerjee, Akhilesh, who is a true sympathizer of minorities asaduddin owaisi spoke clearly | राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

googlenewsNext

अल्पसंख्याक समाज आणि यातही मुस्लीम समाजाच्या दृष्टीने देशात चालणारे राजकारण काही नवीन नाही. अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष त्यांना सहनुभूती दाखवत असतात. मात्र, अशा सर्व पक्षांमध्ये खरा सहानुभूतीदार कोण? यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, सर्वच पक्षांनी अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडल्याचे म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार असदुद्दी ओवेसी यांना टीवी 9 भारतवर्षच्या एका कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला होता की, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि मायावती यांपैकी अल्पसंख्यकांचा सहानुभूतीदार कोण? यावर ते म्हणाले, सर्वांनीच अल्पसंख्याक समाजाचे मोठे नुकसान केले आहे. कुणी घाबरवून, कुणी हासून, कुणी कवाली म्हणून तर कुणी गोल टोपी घालून आम्हाला लॉलीपॉप दिले.
 
अखिलेश यादव यांना मुस्लिमांची सर्वाधिक मते - ओवैसी
अखिलेश यादव यांच्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, उत्तर प्रदेशच्या इतिसाहात मुस्लिमांची जेवढी मते त्यांना मिळाली (2022 मध्ये) तेवढी कुणालाही मिळाली नाहीत. तरीही भाजपला हरवू शकले नाही. आता त्यांच्याच एका आमदाराचा पेट्रोलपंप तोडला जातो, तरी बोलू शकत नाहीत. 

राहुल गांधींवर निशाणा -
राहुल गांधींवर निशाणा साधत ओवेसींनी प्रश्न केले की, राहुल गांधी यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री जी.बी.पंत यांच्याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा सुरू झाला नाही? आपले वडील पंतप्रधान असतानाच कुलूप उघडले गेले नाही? जेव्हा मशीद पाडली गेली, तेव्हा आपल्याच पक्षाचे पंतप्रधान होते? यांच्याच सरकारच्या  काळात 1986 मध्ये 350 मुस्लीमांना गोळ्या घातल्या गेल्या.

ममतांच्या बंगालमध्ये मुस्लिमांची स्थिती खराब -
ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. मालदा, मुर्शिदाबादच्या भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण WHO च्या निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे.

मायावतींबद्दल काय म्हणाले? -
मायावतींसंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, ते या तिघांपेक्षा त्यांचा अधिक आदर करतात. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी SC-ST समाजाला एक ओळख आणि राजकीय ताकद दिली. मात्र त्यांनी काही बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे दुःख आहे. म्हणूनच आज त्या कमकुवत दिसत आहेत. त्या ज्या दिवशी स्पष्ट भूमिका घेईल, त्याना उत्तर प्रदेशात फायदा होईल.

Web Title: Among Rahul Gandhi, Mamata Banerjee, Akhilesh, who is a true sympathizer of minorities asaduddin owaisi spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.