शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पीएनबी घोटाळ्यातील रक्कम १,३२३ कोटींवर, बँकेनेच दिली शेअर बाजाराला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:48 AM

नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे.

नवी दिल्ली : नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे.बनावट हमीपत्रांच्या आधारे मोदी व अन्य सहयोगी कंपन्यांनी हा घोटाळा केला. बनावट हमीपत्रे जारी करून, त्या आधारे भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांतून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलायचे, ही पद्धत यात वापरण्यात आली. ही सर्व हमीपत्रे पीएनबीच्या मुंबईतीलएका शाखेतून जारी झाली आहेत. तथापि, पीएनबीच्या वहीखात्यात हमीपत्रांची नोंदच केली जात नसल्यामुळे, ही बनवेगिरी वर्षानुवर्षे सुरू राहिली.पीएनबीने एक दस्तावेज मुंबई शेअर बाजारात सादर केला. त्यात घोटाळ्यातील रक्कम १,३00 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे म्हटले आहे. या दस्तावेजाद्वारे आम्ही असे नमूद करू इच्छितो की, अनधिकृत वित्तीय व्यवहारांतील रक्कम २0४.२५ दशलक्ष डॉलर (अंदाजे) असू शकते, असे बँकेने नमूद केले आहे.पीएनबीने दिलेला आकडा अमेरिकी डॉलरमध्ये आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार ही रक्कम १,३२३ कोटी रुपये होते. या आधी १४ फेब्रुवारी रोजी बँकेने बीएसईमध्ये दाखल केलेल्या दस्तावेजात घोटाळ्याची रक्कम अंदाजे १.७७ अब्ज डॉलर (११,४00 कोटी रुपये) असल्याचे म्हटले होते.नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्या कंपन्यांनी हा घोटाळा घडवून आणला आहे. हे दोघेही हिºयाचे व्यापारी असून, घोटाळा उघडकीस आल्यानंतर ते देश सोडून पळून गेले आहेत.मोदीच्या कंपनीची अमेरिकेत दिवाळखोरी-न्यूयॉर्क : भारतात पंजाब नॅशनल बँकेस कोट्यवधींचा गंडा घालणाºया मोदी याच्याच व्यावसायिक साम्राज्याचा भाग असलेल्या ‘फायरस्टार डायमंड््स इनकॉपोॅ.’ या अमेरिकेतील कंपनीने दिवाळखोरी जाहीर करून घेण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.ही कंपनी मोदीच्याअमेरिकेसह युरोप, मध्यआशिया व आग्नेय आशियाई देशांतील हिºयांच्या व्यापाराचे काम पाहते. ए. जॅफ्फे इनकॉर्पो. व फॅन्टसी या दोन संलग्न कंपन्यांचाही या दिवाळखोरीच्या दाव्यात समावेश आहे. रोखतेची चणचण व हिरे पुरवठ्यातील अडचणी ही यासाठी कारणे दिली गेली आहेत.भारतात दाखल झालेल्या फौजदारी फिर्यादींचा या कंपनीशी काहीही संबंध नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने पूर्वी म्हटले होते. मोदीकडून बुडविल्या गेलेल्या भारतीय बँकांनी मात्र यावर भाष्य केलेले नाही.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक