शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

एनआरआय विद्यार्थ्याने भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान केली बक्षिसाची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 10:55 PM

कुवैतमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय विद्यार्थ्याने  आज आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान करून आपल्यातील देशप्रेमाचा प्रत्यय दिला आहे.

नवी दिल्ली, दि. 3 - देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या भारतीय लष्कराबाबत देशवासियांमध्ये आदर आणि अभिमानाची भावना दिसून येते. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेर राहणारे भारतीयही आपले देशप्रेम वेळोवेळी दाखवत असतात. कुवैतमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय विद्यार्थ्याने  आज आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान करून आपल्यातील देशप्रेमाचा प्रत्यय दिला आहे. कुवैतमध्ये राहणाऱ्या रिद्धीराज कुमार या विद्यार्थ्याने आपल्याला मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेचा 18 हजार रुपयांचा धनादेश लष्कराच्या मदतनिधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. ऑस्ट्रेलियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च इंटरनॅशनल बेंच मार्क टेस्टमध्ये रिद्धिराज याने बक्षीस जिंकले होते. रिद्धिराज हा कुवैतमधील इंडियन एज्युकेशनल स्कूलमध्ये शिकत आहे. तसेच  गणित आणि विज्ञान या विषयात उत्कृष्ट अध्ययन करत त्याने आतापर्यंत 80 कुवैत दिनार बक्षीस म्हणून मिळवले आहेत. दरम्यान आज त्याने आपल्या आईसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्याने  मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेचा 18 हजार रुपयांचा धनादेश लष्कराच्या मदतनिधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, मोदींनी आज महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजे हे सुद्धा उपस्थित होते. संभाजी राजेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.