Amrit Bharat Express: सुपरफास्ट 'वंदे भारत एक्सप्रेस'नंतर आता देशाला 'अमृत भारत एक्सप्रेस' मिळणार आहे. याची सुरुवात बिहारमधील दरभंगा आणि पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून होईल. पहिली अमृत भारत दरभंगा ते बिहारहून दिल्लीला धावेल तर दुसरी ट्रेन पश्चिम बंगालच्या मालदा ते बुंगळुरुला जाईल. या नवीन ट्रेनमध्ये पुश-पुल तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सांगतात की, वंदे भारत नंतर अमृत भारत एक्सप्रेस पुश-पुल तंत्रज्ञानावर तयार करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञानच या ट्रेनची खासियत आहे. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान, या ट्रेनमध्ये बसवलेले पुश-पुल तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा नेमका काय फायदा आहे, हे जाणून घेऊ..
पुश-पुल तंत्रज्ञान म्हणजे काय?या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ट्रेनमध्ये दोन इंजिन असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर एक इंजिन ढकलायचे काम करते आणि दुसरे ओडायचे काम करते. ट्रेनच्या समोर बसवलेले इंजिन ट्रेन खेचण्याचे काम करेल आणि मागच्या बाजूला बसवलेले इंजिन धक्का मारेल. यामुळे ट्रेन अतिशय वेगाने धावू शकेल. यापूर्वी वंदे भारत ट्रेनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पुश-पुल तंत्रज्ञानामुळे या गाड्यांची गती, शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहे.
अमृत भारत ट्रेनया ट्रेनला सर्वसामान्यांची ट्रेन म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखे आलिशान कंपार्टमेंट नसतील. या ट्रेनमध्ये फक्त द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच आणि जनरल डबे असतील. या ट्रेनचे भाडेही कमी असेल. विशेषत: सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ही ट्रेन बनवण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा यांना जोडतील. भविष्यात याचा देशभरात विस्तार होऊ शकतो.