शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

अमृतपाल सिंगने पाकिस्तानमधून मागवल्या होत्या रायफली, स्वतःचे सैन्य तयार करण्याचे होते प्लॅनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:29 AM

Amritpal Singh : सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या.

नवी दिल्ली : 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा अद्याप शोध सुरूच आहे. पाच राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, अमृतपाल सिंगबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. अमृतपाल सिंगचे जम्मू-काश्मीर कनेक्शन समोर आले आहे. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या.

सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला आपल्या अमृतपाल टायगर फोर्स आणि आनंदपूर खालसा फोर्सच्या सदस्यांना एके ४७ आणि एके ५६ चे प्रशिक्षण द्यायचे होते. इतकेच नाही तर फरारी अमृतपाल सिंग पाकिस्तानच्या निवृत्त मेजरच्या मदतीने आपल्या साथीदारांसाठी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैन्य तयार करण्याचा विचार करत होता. धोकादायक शस्त्रांची ही खेप जम्मू-काश्मीरमधील एका तस्कराच्या माध्यमातून अमृतपाल सिंगपर्यंत पोहोचणार होती.

विशेष म्हणजे, अमृतपाल सिंगला शस्त्रांची डिलिव्हरी मिळाली होती की नाही, याबाबत अद्याप सस्पेंस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांची कारवाई शस्त्रास्त्रांची खेप मिळण्यापूर्वी किंवा त्यादरम्यान सुरू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आहे.

३५३ जणांपैकी १९७ जणांची सुटकाअमृतपाल सिंगच्या प्रकरणात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या ३५३ जणांपैकी १९७ जणांची पंजाब पोलिसांनी सुटका केली आहे. यातील अनेकांवर पोलिसांनी रासुका लावला होता. पोलिसांनी १८ मार्च रोजी अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली, तेव्हापासून तो फरार आहे. पोलिसांना चकमा देऊन तो वारंवार फरार होत आहे. अमृतपाल सिंगचा ९ राज्यांमध्ये शोध सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPunjabपंजाब